मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:34+5:302020-12-31T04:15:34+5:30
सोनेचांदीने गाठला विक्रमी टप्पा नाशिकमधील सराफी बाजारात सोने व चांदीने आतापर्यंतचा सर्वाधिक भावाचा विक्रमी टप्पा गाठला. ७ ऑगस्ट २०२० ...
सोनेचांदीने गाठला विक्रमी टप्पा
नाशिकमधील सराफी बाजारात सोने व चांदीने आतापर्यंतचा सर्वाधिक भावाचा विक्रमी टप्पा गाठला. ७ ऑगस्ट २०२० रोजी ५८ हजार २००, तर चांदी ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. कोरोनामुळे अनेकांनी गुंतवणुकीचा सर्वाधिक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला पसंती दिली. त्यामुळे टाळेबंदीनंतर सराफ बाजार सुरू होताच सोने व चांदीच्या भावांनी विक्रमी उसळी घेतली.
सराफ, कापड विक्रेत्यांना फटका
नाशिक शहरातील जवळपास तीन हजार घाऊक व किरकोळ कापड विक्रेते व एक हजार ५०० सराफ व्यावसायिकांना कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका बसला. शहरात २३ मार्चपासून लागू टाळेबंदी जुलैपर्यंत सुरूच होती. त्यामुळे व्यावसायिकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. विशेष म्हणजे शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी व्यावसायिकांनी १९ ते २१ मार्च असे तीन दिवस स्वयंस्फूर्तीने टाळेबंदीचे पालन केले होते.