सिन्नर आगाराला तीन कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:09 PM2020-05-13T21:09:09+5:302020-05-14T00:44:37+5:30
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिन्नर आगाराला विविध मार्गावर धावणाऱ्या फेऱ्यांतून दररोज अंदाजे तीन लाखांचे उत्पन्न मिळते. ग्रामीण व शहरी भागातदेखील नागरिकांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्ह्यात ‘रेड झोन’ असल्याने सध्यातरी एसटी धावणार नाही. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारखाने मर्यादित कामगारांवर सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकºयांना बाजार समिती, बँक, दवाखाने, किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार लालपरीचाच आहे. लॉकडाऊनमुळे आगारातील ७३ बसेस जागेवरच थांबलेल्या आहेत. येथून रोज पुणे, नाशिक, मुंबईदरम्यान लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशांना घेऊन जाणाºया बसेस आजही आगारात उभ्या आहे.
सिन्नर आगारामध्ये ५० तांत्रिक कर्मचाºयांची संख्या आहे. आगारातील वर्कशॉपमधील कर्मचारी रोज न चुकता वर्कशॉप मध्ये येऊन बंद स्थितीत असणाºया बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून रोज बसेस चालू-बंद करत आहेत. बॅटºयांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रोज सुमारे ६ लाखांचे उत्पन्न देणाºया या बसेस आगारामध्ये थांबून आहेत. आगारातील ३०० चालक-वाहक आज घरी बसून आहेत. बसेस बंद असल्याने पार्सल सुविधाही बंद झाली असून, त्या उत्पन्नावरही एस.टी.ला पाणी सोडावे लागले आहे.
----------------------
दररोज तीन लाखांच्या उत्पन्नावर पाणी
सिन्नर आगारामध्ये १४५ वाहक व १५५ चालक आहेत. त्यात काही तालुक्यात जाणारे व इतर काही लांब पल्ल्याच्या मार्गावर बसची ने-आण करणारे वाहनचालक आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन वाहक-चालक आणि कर्मचाºयांना देण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचेही वेतन येत्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता असून, ते कर्मचाºयांना तातडीने देण्यात येईल. अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, कामगार अडकले असून, नागरिकांनी शासकीय नियमांची पूर्तता करून बसची मागणी नोंदवल्यास ग्रुपप्रमाणे ५० टक्के आसनक्षमतेनुसार बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी यासंदर्भात आगारात संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी केले आहे.