ओझर, कळवणच्या गटार सांडपाणी व्यवस्थापनासाठी तीन कोटी
By admin | Published: August 19, 2014 12:02 AM2014-08-19T00:02:57+5:302014-08-19T01:19:57+5:30
पिंंपळगाव, चांदवडचाही समावेश
कळवण : कळवण शहराचा वाढता विस्तार आणि त्यामुळे उदभवणारी समस्यांनी सर्वच वेठीला धरले जातात. त्यामुळे रस्ते, गटार व सांडपाणी या प्रमुख समस्या जनतेला भेडसावतात. शहराच्या गटार व सांडपाणीचे निर्मूलन कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नाबार्डकडून तीन कोटी ५६ लाख रुपये मंजूर झाले आहे.
जिह्यातील कळवण, पिंपळगाव बसवंत, ओझर व चांदवड या चार शहरांमध्ये नाबार्डच्या अर्थसहाय्यतेतून ग्रामीण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविला जावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता. त्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून यामध्ये राज्यातील सुमारे २८ गावांचाही समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून याबाबत सर्वेक्षण करण्यात येवून शासनस्तरावर अहवाल सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार कळवणसाठी ३ कोटी ५६ लाख रुपये, पिंपळगाव बसवंतसाठी ५ कोटी २७ लाख रुपये, चांदवडसाठी ५ कोटी ७७ लाख रुपये तर
ओझरसाठी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिली.