तीन धरणे १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:26 AM2019-08-01T01:26:07+5:302019-08-01T01:26:48+5:30

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

Three dams paid 5 percent | तीन धरणे १०० टक्के भरली

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे पठावे येथील धरण ओसंडून वाहू लागले आहे.

Next
ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : दहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली असली तरी कळवण, बागलाण, निफाड, देवळा येथे अपेक्षित पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसत आहे. गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ५३१० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. करंजवन ६८ टक्के भरले आहे.
येथील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या २२६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावली धरण ८७ टक्के भरले आहे तर येथून १३,०५८ क्यूसेक, वालदेवी प्रकल्पातून ४०७, कडवा धरणातून ७०५६ तर नांदूरमधमेश्वरमधून ४६९८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची टक्केवारीनाशिक : ३१.४, इगतपुरी : १३४.०,
त्र्यंबकेश्वर : ७९.०, दिंडोरी : २९.०, पेठ : ५५.१, निफाड : ९.७, सिन्नर : २६.०, चांदवड : ११.०, देवळा : ३.४, येवला : ९.८, नांदगाव : ९.०, मालेगाव : १८.०, बागलाण : ६.०, कळवण : ७.०, सुरगाणा : ५२.३. जिल्ह्यात आता पर्यत झालेल्या पावसाने काही तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण २४ धरणांच्या पाण्याची टक्केवारी ४८ टक्के इतकी असून, मागीलवर्षी जुलैमध्ये ५६ टक्के इतका पाणीसाठा होता. काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पुढील चोवीस तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Three dams paid 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण