गोळीबार प्रकरणात दोघांना तीन दिवस कोठडी ; पोलिसांकडून शस्त्र पुरविणाऱ्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 04:57 PM2020-03-10T16:57:08+5:302020-03-10T16:59:33+5:30
उदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१०)न्यायालयात हजर केले करण्यात आले होते. या दोघांचीही न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नाशिक : मालेगाव स्टॅन्ड परिसरात महिन्याभरापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादाची कुरापत काढून सोमवारी (दि.९) मखमलाबाद शिवारात उदयनगर येथे किरण गोविंद भडांगे याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघा संशयित आरोपींची न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे
उदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१०)न्यायालयात हजर केले करण्यात आले होते. या दोघांचीही न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मखमलाबाद शिवारात उदयनगर परिसरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रिक्षा व दुचाकीवरून आलेल्या संशयित आरोपी प्रशांत बाळासाहेब फड, चेतन दीपक वाघ, कुणाल सुधाकर एखंडे, सचिन उर्फ वास्तव पवार या चौघांनी इस्त्रीच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या भडांगेवर पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर संशयित पसार झाले होते. पोलिसांनी प्रशांत फड, कुणाल एखंडे यांना द्वारका परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या महिन्यात मालेगाव स्टँड येथे संशयित व भडांगे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाले होते, त्याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी भडांगेवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी पिस्तूल तसेच चार जिवंत काडतुसे व रिक्षा क्रमांक एमएच १५ एफयू ५१०१, दुचाकी सिटी डॉन क्रमांक एमएच १५ जीएच ५२२८ म्हसरूळ पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार तपास करीत आहे.