तीन दिवसांत द्राक्षांचे भाव ५० टक्क्यांनी कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:20+5:302021-02-24T04:16:20+5:30
पाउस पडल्याने व्यापाऱ्यांना द्राक्ष माल पोहोचण्याची शाश्वती वाटत नाही यामुळे अनेक व्यापारी द्राक्ष बागांकडे फिरकतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. ...
पाउस पडल्याने व्यापाऱ्यांना द्राक्ष माल पोहोचण्याची शाश्वती वाटत नाही यामुळे अनेक व्यापारी द्राक्ष बागांकडे फिरकतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. थॉमसन सारखा माल किमान थोडाफार तग धरु शकतो पण काळी आणि परपल ही द्राक्ष पाऊस पडल्यानंतर लगेचच खराब होउ लागतात यामुळे अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना माल घेउन जाण्याची घाई करत असल्याने तीन दिवसांत भाव ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
कोट -
माझा एक एकर द्राक्ष बाग आहे. वर्षभरात बागासाठी दीड ते पावनेदोन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग चांगला बहरला होता किमान ६० ते ७० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती पण पाऊस पडला आणि निम्मा माल खराब झाला आहे. व्यापाऱ्याने २० क्विंटल माल चक्क फेकुन दिला आहे. अजुनही किती नुकसान होईल याचा अंदाज नाही -हिरामन ढिकले, द्राक्ष उत्पादक , पिंप्री सयद
चौकट-
परपल , काळी द्राक्षांना अधिक धोका
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यंनी परपल आणि काळी या द्राक्षांची लागवड केलेली आहे. या द्राक्षांना भाव चांगला मिळत असला तरी पावसामुळे त्यांचेही भाव उतरले आहेत. पाऊस पडल्यानंतर ही द्राक्ष लगेच कोमेजतात यामुळे माल बाजारापयंत पोहोचेल की नाही याची व्यापाऱ्यांना शाश्वती नसल्याने हा माल अगदीच कमी भावाने खरेदी केला जात आहे.
===Photopath===
230221\23nsk_41_23022021_13.jpg
===Caption===
व्यापाऱ्याने फेकलेला माल शेतकऱ्यांना स्वत विकावा लागत आहे