गडावर तीन दिवस वाहनांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:21 AM2018-10-21T01:21:31+5:302018-10-21T01:21:51+5:30
कोजागरी पौर्णिमा व हिल मॅरेथॉनमुळे पुढच्या आठवड्यात सप्तशृंगगडावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नाशिक : कोजागरी पौर्णिमा व हिल मॅरेथॉनमुळे पुढच्या आठवड्यात सप्तशृंगगडावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंगळवारी २३ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत तसेच निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स यांच्या वतीने रविवार, दि. २८ आॅक्टोबर रोजी नांदुरी ते सप्तशृंगी घाट रस्त्यावर सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सप्तशृंगी हिल मॅरेथॉन सकाळी ६ ते ९.३० वाजेदरम्यान असल्यामुळे या तीन दिवशी भाडोत्री टॅक्सी, आॅटो रिक्षा व सर्व प्रकारची खासगी चारचाकी व दुचाकी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस इत्यादी वाहनांना गडावर प्रवेशबंदीचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.