एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

By admin | Published: June 1, 2017 02:12 AM2017-06-01T02:12:41+5:302017-06-01T02:12:52+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली

Three deadly murders of a single family | एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मृतांत दाम्पत्यासह मुलाचा समावेश आहे. तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा तीन संशयिताना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
कोकणगाव खुर्द शिवारात टॉवरच्या माथ्यावर जगन्नाथ मुरलीधर शेळके (४५), शोभा जगन्नाथ शेळके (४२), हर्षद जगन्नाथ शेळके (२०), सोमनाथ जगन्नाथ शेळके (२१) असे चौघे वास्तव्यास होते. ते शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करत. ३० मे रोजी लखमापूर फाटा येथे पिंटू पाटील यांच्या मुलीचा हळदीच्या कार्यक्रमासाठी सोमनाथ शेळके दुपारी ५ वाजेच्या सुमारास गेला होता. रात्री १० वाजता तो घरी परतला. त्यावेळी घरचा दरवाजा उघडा दिसला. तसेच टीव्ही सुरू होता. घरात कुणी दिसत नाही म्हणून त्याने स्वयंपाकघरात डोकावले असता हर्षद शेळके उंबरठ्यावर पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सोमनाथ याने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ याने आई-वडिलांना हाक मारली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ याने शेजारी राहणारे नातेवाईक सुधाकर शेळके व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले. त्यांनीही हर्षदला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जगन्नाथ शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता स्वयंपाक घरालगतच्या खोलीतून भ्रमणध्वनीच्या रिंगचा आवाज आल्याने सर्व सदस्यांनी याठिकाणी धाव घेतली. याठिकाणी जगन्नाथ शेळके जमिनीवर मृतावस्थेत पडलेले होते. त्यांच्याही डोक्यातूून रक्त येत होते. तर शोभा शेळके यादेखील दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता ते घटनास्थळावरच घुटमळले. प्रयोगशाळा अधिकारी, ठसे तज्ज्ञ यांनीदेखील घटनास्थळी भेट देत नमुने ताब्यात घेतले आहेत. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Three deadly murders of a single family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.