विभागात तीन महिन्यांत ४४ मृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:01 AM2019-08-23T02:01:04+5:302019-08-23T02:01:24+5:30
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.
नाशिक : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.
सलग दहा दिवस झालेल्या पावसाचा फटका सर्वत्र बसला. नाशिकबरोबरच धुळ्यालादेखील पावसाचा तडाखा सहन करावा लागला. नंदुरबार, जळगाव आणि नगरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भिंत कोसळून, पुरात वाहून तसेच वीज पडून मृत पावलेल्यांचा यात समावेश आहे. गेल्या सोमवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पाचही जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी मदत आणि उपाययोजनांची माहिती घेतली. (पान ३ वर)
ेविभागात तीन महिन्यांत ४४ मृत्यू
(पान १ वरून)
जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत विभागात सर्वत्र कुठे ना कुठे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्णाची संख्या सर्वाधिक आहे. नैसर्गिक आपत्तीतील विविध कारणांमुळे एकूण १३ जण प्राणास मुकले आहेत. तर धुळे आणि नंदुरबार येथे १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. जळगाव तसेच नगर येथे अनुक्रमे ५ आणि २ इतके लोक मृत्युमुखी पडले. शाासनाच्या आपत्ती नियमाप्रमाणे संबंधित मयतांच्या वारसांना नियामानुसार देण्यात येणारी मदत देऊ करण्यात आलेली आहे. विभागातून सुमारे १०४ लाखांची मदत मयतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.
विभागातील ४४ प्रकरणांमधील ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली, त्यापैकी २६ प्रकरणांमध्ये संबंधितांच्या वारसांना मदत करता आली. नाशिक जिल्ह्णातील १३ प्रकरणांपैकी ८ प्रकरणे पात्र धरण्यात आली. तर धुळे येथील सर्वच्या सर्व १२ प्रकरणे मंजूर झाली. धुळ्यातील १० तर जळगाव आणि नगर येथील प्रत्येकी २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली किंबहुना त्यांना मदतीसाठी पात्र धरण्यात आले. नगर आणि धुळ्यातील सर्व प्रकरणे मंजूर करण्यात आले, मात्र नाशिकमधील सर्वाधिक प्रकरणांना कात्री लावण्यात आली.
—इन्फो—
पात्र प्रकरणांना आर्थिक मदत
विभागात मयत झालेल्या ४४ प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली तर २६ प्रकरणांमधील बाधितांना आर्थिक मदत देण्यात आली. नाशिकमधील ८, धुळे येथील ५, नंदुरबार येथील ९, जळगाव येथील २ तर अहमदनगर येथील २ प्रकरणांना मदत करण्यात आली आहे.