वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:21 AM2018-08-14T01:21:24+5:302018-08-14T01:21:40+5:30

हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव, दिंडोरी तालुक्यातील शिवनई व येवला तालुक्यातील कासूर येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा सोमवारी (दि़१३) मृत्यू झाला़

Three die in different situations | वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

Next

नाशिक : हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव, दिंडोरी तालुक्यातील शिवनई व येवला तालुक्यातील कासूर येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा सोमवारी (दि़१३) मृत्यू झाला़  धोंडेगाव येथील रहिवासी यादव पांडू बेंडकुळी (६५) हे रविवारी रात्रीच्या सुमारास रस्त्याने पायी येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या यादव बेंडकुळी यांना मुलगा कैलास याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे सोमवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़ हिराबाई माणिक गटकळ (४५ रा. शिवनई, पो. आंबेदिंडोरी, ता. दिंडोरी) या शेतावरील मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता स्टार्टरच्या पेटीतील उघड्या वायरला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हिराबाई यांना भाचा खंडेराव ढुमणे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  तिसºया घटनेत येवला तालुक्यातील कासूर येथील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ नीलिमा शिवाजी गोविंद (१७) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीलिमाने रविवारी दुपारी गळफास घेतला़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तत्काळ नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि़१३) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three die in different situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू