तिघा महिला प्रवाशांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:09 AM2019-09-19T00:09:14+5:302019-09-19T00:09:40+5:30
सीबीएसवरून सिन्नरला बसमधून जाणाऱ्या दोघा महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले. दरम्यान, नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
नाशिकरोड : सीबीएसवरून सिन्नरला बसमधून जाणाऱ्या दोघा महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले. दरम्यान, नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
हिवरे येथील आशा रूपवते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या पती समवेत जुने सीबीएस येथून सिन्नरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. नाशिकरोड बिटको चौक सिग्नल येथे बस आली असता रूपवते यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतमधील एक सोन्याचा मणी त्यांच्या अंगावर पडला. रूपवते यांनी गळ्याला हात लावून बघितले असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत तुटलेली आढळली. त्याचप्रमाणे घोडेकर यांच्या गळ्यातीलदेखील मंगळसूत्र तुटलेले आढळले. सीबीएस ते बिटकोदरम्यान अज्ञात चोरट्याने दोन्ही महिला प्रवाशांचे मंगळसूत्र गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी चोरून नेले.
नाशिकरोड बसस्थानकात गेल्या काही दिवसांत महिलांच्या पर्समधून मौल्यवान वस्तू, रोकड, पुरुषांचे पाकीट, मोबाइल आदी चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या ठिकाणी पोलीस चौकी असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नसून पाकिटमार चोरांनी उच्छाद मांडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाकिटमार चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त झालेल्या प्रवाशांनी केली आहे. दरम्यान पंचवटी, सिडको सातपूर परिसरात चोºयांच्या घटनांत वाढ झाली आहे.
पर्समधून दागिन्यांची चोरी
नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. संगमनेर येथील वयोवृद्ध सुनीता सुधाकर शंखपाळ या नाशिकरोड येथे आपल्या नातेवाइकांकडे आल्या होत्या. शंखपाळ या मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकातून संगमनेरला जाण्यासाठी नाशिक-शेगाव संगमनेरमार्गे जाणाºया बसमध्ये बसल्या. शिंदेगावपर्यंत बस गेल्यानंतर शंखपाळ यांना आपल्या पर्सची चैन अर्धवट उघडी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पर्स तपासली असता छोट्या काळ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची ठुशी, दोन हजार रुपये रोख असा ४० हजार रुपयांचा ऐवज व आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅँकेचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.