नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:55 PM2019-09-12T19:55:56+5:302019-09-12T19:56:16+5:30

नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

Three Ganesh devotees drown in Nashik; 5 Success to rescue people | नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

Next

नाशिक : शहर व परिसरात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नाशिकमधील गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा येथे तिघेजण बुडाले. 5 गणेशभक्तांना सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांना यश आले तर एक महाविद्यालयीन तरुण युवक बेपत्ता झाला आहे.

तसेच रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली एका प्रशांत पाटील(३८) नावाच्या युवकाने गोदावरीत बाप्पा ला निरोप देताना सूर लगावला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला ही बाब अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांच्या लक्षात येताच जीवरक्षक दीपक जगताप याने नदीत उडी घेतली तर लिडिंग फायरमन इकबाल शेख, घनश्याम इंफाळ, तानाजी भास्कर यांनी राबरी बोटीने पाठलाग सुरू केला. रोकडोबा व्यामशाळेपासून पुढे बुडणाऱ्या युवकाला रेस्क्यू करण्यास यश आले. तसेच जगन्नाथ शर्मा (वय 40), मनोज भारत (वय  42), श्रीवास्तव  ( वय 50) या तिघांना ही अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केले.
तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन  सुमारे पंचवीस जण आले होते . त्यात चौघांनी गणपती बुडविण्यासाठी  पाण्यात  उड्या घेतल्या त्यातील तीन जण बाहेर आले परंतु  युवक युवराज राठोड (वय २८,रा.अंबड)  हा काही वर आला नाही ,  मित्रांनी पाण्यात शोध घेतला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडल्याची घटना घडली आहे. मागील वर्षी याच तलावात दोन तरुण  बुडाले होते, मागील वर्षाची पुनरावृत्ती घडल्याने प्रशासनाच्या बंदोबस्तावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर व वाडीवरहे  पोलीस प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहेत , बुडालेल्या राठोड चा शोध अंधार पडेपर्यंत सुरू होता.

गंगापूर धरणातून गोदावरीच्या पत्रात सुमारे 1 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहेत. तसेच त्रंबकेश्वर भागात देखील पाऊस जोरदार झाल्याने येथील तलाव, नद्या, ओहोळ दुथडी वाहत आहेत. अनंत चतुर्दशी च्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विसर्जन साठी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले होते.

Web Title: Three Ganesh devotees drown in Nashik; 5 Success to rescue people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.