तीनशे बालके शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:00 AM2018-11-30T01:00:49+5:302018-11-30T01:01:41+5:30
नाशिक : प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा किंबहुना बालकांचा हा घटनात्मक अधिकार असून, वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्णात बालरक्षकांनी २८३ बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत.
नाशिक : प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा किंबहुना बालकांचा हा घटनात्मक अधिकार असून, वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्णात बालरक्षकांनी २८३ बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत.
२०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यात इयत्ता आठवीपर्यंतच ४.२० लाख मुले शाळाबाह्ण असल्याची बाब समोर आली होती. या शाळाबाह्ण मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्टÑ शासनाने ९ जानेवारी २०१७ मध्ये शासन निर्णय काढून ‘बालरक्षक पद’ तयार केले होते. बालकांच्या शिक्षण, हक्क व अधिकार यांचे जतन करणारी व्यक्ती म्हणजेच बालरक्षक आणि शिक्षकांनाचा ऐच्छिक स्वरूपात ही जबाबदारी देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील १ हजार १७९ शिक्षकांनी बालरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी रस्त्यावर भीक मागणारी, खेळ करणारी आणि मोलमजुरी करणाऱ्या बालकांना यापासून परावृत्त करून शिक्षणासाठी प्रवृत्त करून शाळेच्या अंगणात आणले आहे.
या बालरक्षकांनी मार्च ते सप्टेंबरअखेर २८३ शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. केवळ आदिवासी, दुर्गम भागातील ही मुले नसून यातील बहुतांश मुले ही शहरालगत असलेल्या गावांत आढळून आली आहेत. त्यामध्ये स्थलांतरीत मुलांची संखा अधिक आहे.तालुकानिहाय प्रशिक्षणशाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम व्यापक राबविण्याच्या दृष्टीने बालरक्षकांना
जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले असून, आता डिसेंबरपासून तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे.