नाशकात सोनसाखळीचोरीचे सत्र सुरूच इंदिरानगरमध्ये दसऱ्यापासून तीन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:55 PM2019-10-12T17:55:09+5:302019-10-12T17:57:52+5:30
महिलांच्या दागिन्यांवर नजर असलेल्या सोनसाखळी चोरांनी दसऱ्यापासून तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनसाखळी चोरी करून हॅट्रीक केल्याने या भागात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल केवळ क्यूआर कोड स्कॅनिंगच्या प्रक्रियेत व्यस्त असताना दुसरीकडे सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
नाशिक : परिसरात महिलांच्या दागिन्यांवर नजर असलेल्या सोनसाखळी चोरांनी दसऱ्यापासून तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनसाखळी चोरी करून हॅट्रीक केल्याने या भागात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल केवळ क्यूआर कोड स्कॅनिंगच्या प्रक्रियेत व्यस्त असताना दुसरीकडे सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
बजरंग कॉलनीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटनासोमवारी (दि.७) घडली. ओजस अवन्यू येथील प्रीती आळंद त्यांच्या सासूबरोबर दसऱ्यासाठी झेंडूची फुले घेण्यासाठी रथचक्र चौकात गेल्या होत्या. त्या परतत असताना बजरंग कॉलनी येथे समोरून आलेल्या दुचाकीवरस्वारांनी प्रीती आळंद यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचसुमारे वीस हजार किमतीची सोनसाखळीओरबडून पोबारा केला. ही घटना ताजी असताना दुसºया दिवशी मंगळवारी (दि.८) चैतन्यनगरच्या शिवपॅलेस अपार्टमेंटमधील रूपाली जाधव या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राणेनगर येथील सप्तशृंगी मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना चेतना नगर भागात समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. तर गुरुवारी(दि १०) रोजी कल्पणा अहिरे पती समवेत रात्री दहा वाजता सुमन बंगल्या समोरून जात असताना काळा रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.