एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:03 PM2020-10-11T22:03:48+5:302020-10-12T01:09:44+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे.

Three incidents of leopard attack in the same week | एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

googlenewsNext
ठळक मुद्देनांदूरवैद्य : पंधरा दिवसांपूर्वी श्वान व अकरा पिल्ले फस्त

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या बिबट्याने हल्ला चढवत जवळच असलेल्या कैलास कर्पे यांनी पाळलेल्या कुञ्यावर झडप घालत फस्त केले असून येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून वस्तीस राहणा-या शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कर्पे तसेच सायखेडे मळ्यामध्ये याआधी देखील गायी, बैल आदींवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून काही दिवसांपूर्वीच एक बिबट्या येथील शेतकरी कैलास कर्पे यांच्या निदर्शनास आला होता. या परिसरात शेती जास्त असल्यामुळे जंगलवाढ झालेली असून बिबट्याचा या परिसरात भक्ष शोधण्यासाठी नेहमी वावर असतो. याच पाशर््वभूमीवर रविवारी बिबट्याने सायखेडे यांच्या शेतवस्तीवरील घराजवळील गोठ्यात असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला असता जवळच असलेले कुञे भुंकायला लागल्यावर तसेच इतर शेतकर्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात माञ वासरू जखमी झाले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी याच वस्तीवर असलेल्या कर्पे यांच्या एका श्वानावर हल्ला चढवत ठार केले होते. तसेच जवळच असलेल्या शेतकर्यांनी देखील अनेकवेळा बिबट्या पाहिला असल्याचे सांगितले असून पुन्हा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असून या शेतवस्तीवर दोन पोल्ट्रीफार्म असल्याने तसेच येथील शेतकर्यांना दुग्धव्यवसायासाठी गावात जावे लागत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून या शेतवस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दत्तु काजळे, नवनाथ कर्पे, नामदेव यंदे, मुकुंदा यंदे, रोहिदास सायखेडे, ज्ञानेश्वर कर्पे, सोपान कर्पे, लहानू सायखेडे, संतू सायखेडे, गोकुळ सायखेडे, आदी. शेतकर्यांनी केली आहे. या झालेल्या हल्ल्यामुळे येथील शेतवस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून शेतकरी धास्तावले आहेत. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतवस्तीवरील शेतकरी करीत आहे.

 

Web Title: Three incidents of leopard attack in the same week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.