पिंपळगावी कार दुभाजकावर आदळून अपघात, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 09:41 PM2021-12-29T21:41:44+5:302021-12-29T21:44:56+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील अंबिकानगर परिसरातून जाणाऱ्या शिर्डी-सुरत महामार्गावर असलेल्या दुभाजकावर मंगळवारी (दि.२८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वणीकडून पिंपळगावच्या दिशेने येणारी (क्रमांक एमएच ४३ अ‍ेएफ ४९७६) ही मारुती कार जाऊन आदळून तिने दोनदा पलटी खाल्ली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालक व त्यात बसलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.

Three injured in car collision in Pimpalgaon | पिंपळगावी कार दुभाजकावर आदळून अपघात, तीन जखमी

पिंपळगावी कार दुभाजकावर आदळून अपघात, तीन जखमी

Next
ठळक मुद्देशिर्डी-सूरत महामार्ग : गतिरोधकाची मागणी

पिंपळगाव बसवंत : येथील अंबिकानगर परिसरातून जाणाऱ्या शिर्डी-सुरत महामार्गावर असलेल्या दुभाजकावर मंगळवारी (दि.२८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वणीकडून पिंपळगावच्या दिशेने येणारी (क्रमांक एमएच ४३ अ‍ेएफ ४९७६) ही मारुती कार जाऊन आदळून तिने दोनदा पलटी खाल्ली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालक व त्यात बसलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात गतिरोधक बसवावे, ही मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वारंवार शिर्डी-सूरत महामार्गावर अपघात होत असून अपघाताचे कारण देखील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी रस्ते प्रशासन विभागाला दिले आहे. पथदीप सुरू करा आणि योग्य ठिकाणी गतिरोधक बसवा अशी मागणी वारंवार होऊनही प्रशासनाला अजूनही घटनेचे गांभीर्य लक्षात नसल्याने पुन्हा त्या ठिकाणी पाचवा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणारी कार दुभाजकाला आदळून उलटली तेव्हा ती वस्तीच्या विरुद्ध दिशेने फेकली गेली. मात्र, ती वस्तीच्या दिशेने आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि दिरंगाईमुळे वस्ती, मंदिर, शाळा असतानादेखील या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नाहीत. फक्त मुखेड फाट्यावर एका ठिकाणी गतिरोधक ठेवण्यात आले आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार केले मात्र कुठलीही दखल घेतली नाही.

- दत्तू झनकर, स्थानिक रहिवाशी
फोटो- २९ पिंपळगाव ॲक्सिडेंट

Web Title: Three injured in car collision in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.