वन्य प्राण्यांची हत्याकरुन मांस विक्री करणारे तिघे कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 09:06 PM2021-10-17T21:06:59+5:302021-10-17T21:08:38+5:30
नांदगाव : शिकार करून आणलेल्या मोर व इतर मृत पक्ष्यांना विकत घेऊन त्यांच्या मांसापासून खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या मालेगाव येथील मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल मड डे, हॉटेल शाही गोल्डन व नवीन बसस्थानकानजीक हॉटेल मदिना दरबारवर छापा टाकून तिथे असलेल्या मांसाचे नमुने वनपरिक्षेत्राधिकारी सी. डी. कासार यांनी घेतले आहेत.

शिकारीत वापरलेली काडतुसे आर. दि. गांधी देवपूर धुळे यांच्याकडून खरेदी केल्याच्या माहितीमुळे चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस वनविभागाने बजावली आहे. संशयित आरोपी मुदस्सर अहमद अकील अहमद (चुनाभट्टी), शाहिद अन्वर शाहिद अहमद (कमालपुरा), अश्रफ अंजूम महमद अन्वर (मिल्लत नगर) यांची नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहा. वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.