नांदगावनजीक अपघातात तीन ठार

By admin | Published: September 7, 2014 12:33 AM2014-09-07T00:33:38+5:302014-09-07T00:39:14+5:30

नांदगावनजीक अपघातात तीन ठार

Three killed in Nandgaon accident | नांदगावनजीक अपघातात तीन ठार

नांदगावनजीक अपघातात तीन ठार

Next


नांदगाव : शहरापासून पाच किमी अंतरावर
असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील वळणावर शनिवारी सायंकाळी दोघा दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
नांदगाव येथील देवी गल्लीत राहारा लखन जावरे (२६) तसेच मालेगाव कॅम्पातील रावळगाव नाका येथे राहणारे लक्ष्मण एकनाथ शेवाळे (४५) व त्यांची मुलगी स्नेहल (१४) जागीच गतप्राण झाले, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. प्रत्येक दुचाकीवर एकूण तीन जण प्रवास करत
होते.
साकोरे येथील आजारी असलेल्या नातेवाइकास भेटून मालेगावकडे परतत असताना लक्ष्मण शेवाळे व त्यांच्या मुलीवर काळाने घाला घातला. शेवाळे यांची पत्नी लीलावती यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत तर लखन बरोबरचे इतर दोघे मित्र राहुल सुकदेव सोनवणे (३०) व भारत सुनील शेलार (२६) हेदेखील गंभीर जखमी आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मालेगावला हलविण्यात आले आहे.
वस्तीशाळा शिक्षक प्रकल्प पाटील आपल्या आजारी आईला मालेगावकडे दुचाकीवरून घेऊन जात असताना त्यांच्या समोरच हाअपघात झाला. हे दृश्य बघून भांबावलेले पाटील यांना सुरुवातीस काहीच सुचेना. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखत लगेच त्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांच्याकडे मोबाइलवरून रुग्णवाहिकेची मागणी केली. डॉ. बोरसे यांनी तत्काळ प्रतिसाद देत रुग्णवाहिका घटनास्थळी धाडली.
मयत शेवाळे मालेगाव तालुक्यात अजंग वडेल येथे प्राथमिक शिक्षक होते. मुलगी व वडीलांच्या मृत्यूमुळे नांदगाव व मालेगावच्या शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील व त्यांच्या सहकार्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. (वार्ताहर)
’ मुंबई : राज्य सरकारने शनिवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पी.के.देशमुख हे रोेजगार हमी योजना आणि जलसंवर्धन विभागाचे नवे सचिव असतील. वनामती; नागपूरच्या महासंचालक विनिता वेद आयसीडीसी; नवी मुंबईच्या नवीन आयुक्त असतील.

मनरेगाचे आयुक्त एम.शंकरनारायणन हे वनामती; नागपूरचे नवे महासंचालक असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in Nandgaon accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.