गोंदे दुमालाजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:05 PM2019-09-03T13:05:29+5:302019-09-03T13:05:58+5:30

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Three killed in Nashik accident near Gondi Dumala | गोंदे दुमालाजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

गोंदे दुमालाजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

Next

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
रोहित शिवाजी पवार (२७ रा. अभिमन्यू अपार्टमेंट शिंगाडा तलावाजवळ नाशिक), प्रफुल्ल धनंजय प्रभू (२२ रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ नाशिक) व दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (२२ रा. शंकर नगर, द्वारका नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. नाशिक येथील पाच जण आपले काम आटोपुन मुंबईहून इनोव्हा कार क्र . एम.एच.१५ डी सी ७१६० ने नाशिक कडे सोमवारी रात्री परतत होते. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान ही कार गोंदेदुमाला जवळ प्रभु धाब्यासमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून नाशिककडून मुंबईकडे जाणा-या ट्रक क्र .एम पी ०९ एच एच ७६५९ या ट्रकवर जावून आदळली त्यामुळे इनोव्हा कारचा चक्काचुर झाला. चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी )अनिल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रु ग्णवाहिका आणि घोटी टोल नाक्यावरील रु ग्णवाहिकेने धाव घेत अपघातातील जखमींना रु ग्णालयात हलविले.यावेळी पोलिस उपअधीक्षक श्रीमती राणे आणि पो.नि. देशमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पुढील तपास वाडिवºहे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख,आण िपो हवा.वाजे,परदेशी करीत आहे.

Web Title: Three killed in Nashik accident near Gondi Dumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक