रासेगाव अपघातातील मृतांची संख्या तीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:11 PM2019-08-03T23:11:59+5:302019-08-03T23:12:23+5:30
पेठ : गुजरात महामार्गावरील रासेगाव नजीक झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून, रत्ना गोकुळ भदाणे यांचे उपचार सुरू असताना मध्यरात्री निधन झाले.
पेठ : गुजरात महामार्गावरील रासेगाव नजीक झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून, रत्ना गोकुळ भदाणे यांचे उपचार सुरू असताना मध्यरात्री निधन झाले.
शुक्र वारी सायंकाळी ट्रक व प्रवासी जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीन प्रवासी ठार झाले असून, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्यरात्री निधन झालेल्या रत्ना भदाणे या उंबरपाडा (सु.) येथील शारदा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. गत १५ वर्षांपासून त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळेत सेवा केली. मागील वर्षी शाळेला २० टक्के अनुदान प्राप्त झाले होते. आतातरी वेतन मिळेल आणि संसाराचा गाडा सुरळीत चालेल या आशेवर असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. जीपचालक बाळू शंकर गांगुर्डे हे २० वर्षांपासून नाशिक-पेठ रस्त्यावर जीप चालवित होते. वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून त्यांनी आपला संसार उभा केला होता. रात्री अपरात्री क्षणाचाही विलंब न लावता कोणाच्याही मदतीला धाऊन जाणाºया बाळू गांगुर्डे यांच्या निधनाने संपूर्ण पेठ शहरावर शोककळा पसरली.
२कल्पेश बोरसे हा सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रय बोरसे यांचा मुलगा होता.
या अपघातामुळे नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दिरंगाईचा प्रश्न समोर आला असून, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या पुलाचे काम धिम्या गतीने सुरू होते. त्यात साइडपट्टी नसल्याने व एकेरी वाहतूक सुरू असल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. पेठ, दिंडोरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.