शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

By admin | Published: January 12, 2015 12:48 AM2015-01-12T00:48:13+5:302015-01-12T00:48:25+5:30

शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

Three killed in Shinde road accident | शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

Next

 नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे शिवारातील कडवा कॉलनीजवळ रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास इनोव्हा व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला़ यामध्ये मुंबईच्या जोगेश्वरी येथील जाबीर शेख, निजामुद्दीन अन्सारी व सायरा अन्सारी या तिघांचा मृत्यू झाला, तर हदीस अन्सारी व सुलतान शेख हे गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना उपचारानंतर मुंबईला हलविण्यात आले़ दरम्यान, इनोव्हा कारचा चक्काचूर झाला असून, अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती़
मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सोहब सिद्दीकी चाळ येथील रहिवासी जाबीर अली मोहम्मद ताहीर अली शेख (५०), निजामुद्दीन हदीस अन्सारी (४७), सायरा हदीस अन्सारी (४२), हदीस अन्सारी (५०), सुलतान जिकरीया शेख (४२) (पान २ वर)

हे आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी वैजापूरला इनोव्हा कारने (एमएच ०६, एएन ७५५७) आले होते़ रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते सिन्नरहून नाशिकरोडकडे येत असताना शिंदे गावाजवळील कडवा कॉलनीजवळ नाशिककडून येणाऱ्या ट्रकवर (आरजे १९, जीबी ६६५४) जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला़
या अपघातानंतर इनोव्हाचे टायर फु टण्याचा मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी धाव अपघातस्थळी घेतली़ इनोव्हाचालक निजामुद्दीन हदीस अन्सारी व त्यांच्याशेजारी बसलेले जाबीर अली मोहम्मद ताहीर अली शेख व पाठीमागे बसलेल्या सायरा हदीस अन्सारी हे तिघे गंभीर जखमी झाले होते़ त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले, तर उर्वरित दोघे जखमी हदीस अन्सारी, सुलतान जिकरीया शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर मुंबईला हलविण्यात आले़
या अपघाताची व वाहतूक कोंडीची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला़ सहायक पोलीस निरीक्षक मच्ंिछद्र केकाण, हवालदार माळोदे व कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई केली़ दरम्यान, या अपघाताची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in Shinde road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.