तीन लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन ७० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:23+5:302021-04-01T04:15:23+5:30

नाशिक: वीज बिल वसुलीचे मोठे उद्दिष्ट असलेल्या महावितरणला ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात लाखो ग्राहकांनी ऑनलाईन ...

Three lakh customers paid Rs 70 crore online | तीन लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन ७० कोटी

तीन लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन ७० कोटी

Next

नाशिक: वीज बिल वसुलीचे मोठे उद्दिष्ट असलेल्या महावितरणला ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात लाखो ग्राहकांनी ऑनलाईन पोर्टलचा वापर करून वीज बिलाचा भरणा केला आहे. नाशिकमध्ये देखील सुमारे तीन लाख ग्राहकांनी सुमारे ७० कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केल्याने महावितरणला आर्थिक हातभार लागला आहे.

वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याबरोबरच नियमित वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अनेकदा ग्राहकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी ग्राहकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच बिल भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आल्यामुळे महावितरणच्या तिजोरीत भर पडली आहे.

नाशिक मंडलात तीन लाख ३८ हजार ग्राहकांनी ७० कोटी, मालेगाव मंडळात ४९ हजार ग्राहकांनी ८ कोटी ३८ लाख, तर अहमदनगर मंडळात १ लाख ९९ हजार ग्राहकांनी ३८ कोटी ६३ लाख रुपयांचा अशाप्रकारे नाशिक परिमंडळात एकूण पाच लाख ८७ हजार ग्राहकांनी ११७ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ''ऑनलाईन'' वीज बिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता नि:शुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीज बिल भरणा केंद्राच्या लाईनमध्ये उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या बिल भरण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत.

लघुदाब वीजग्राहकांसाठी ''ऑनलाईन'' बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीज बिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेट बँकिंगचा अपवाद वगळता वीज बिलांचा 'ऑनलाईन'' भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते; परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ''ऑनलाईन''द्वारे होणारा वीज बिल भरणा आता नि:शुल्क आहे.

यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीज बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ’आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीज बिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत कळवण विभागात ९ हजार १५८ ग्राहकांनी १ कोटी ६२ लाख, मालेगाव विभागात १० हजार ६२८ ग्राहकांनी २ कोटी २ लाख, मनमाड विभागात १९ हजार ३६९ ग्राहकांनी ३ कोटी २० लाख, तर सटाणा विभागात १० हजार २८४ ग्राहकांनी १ कोटी ५२ लाख अशा प्रकारे मालेगाव मंडळात एकूण ४९ हजार ४३९ ग्राहकांनी ८ कोटी ३८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

--- इन्फो---

जिल्ह्यातील विभागनिहाय भरणा

चांदवड विभागातील २४ हजार ५२० ग्राहकांनी ४ कोटी ५२ लाख, नाशिक ग्रामीण विभागातील ५४ हजार ३७९ ग्राहकांनी ११ कोटी ७३ लाख, नाशिक शहर विभाग १ मध्ये ९१ हजार ७१९ ग्राहकांनी २८ कोटी ३ लाख आणि नाशिक शहर विभाग २ मध्ये १ लाख ६७ हजार ८११ ग्राहकांनी २६ कोटी ३७ लाख रुपये याप्रमाणे नाशिक मंडळामध्ये ३ लाख ३८ हजार ४२९ ग्राहकांनी ७० कोटी ६६ लाख रुपयांचा ''ऑनलाईन''द्वारे वीज बिलांचा भरणा केला आहे.

Web Title: Three lakh customers paid Rs 70 crore online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.