गुन्हेगाराकडून तीन लाखांचे दागिने, दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:38 PM2020-08-28T23:38:35+5:302020-08-28T23:38:58+5:30
घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.
सिडको : घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.
अंबड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये स्वामी नगर येथे मारहाण झाल्यामुळे व दुचाकी वाहनाची तोडफोड केल्यामुळे अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गुन्हा झाल्यापासुन फरार होता. संशयित फरार आरोपी करण अण्णा कडुसकर (19 , रा. आनंद सागर फ्लॅट नंबर 1,अंबड) याचा शोध सुरू होता. कडुसकर हा अंबड गाव स्मशानभुमी जवळ येत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली असता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन कडुसकर ला पकडले.संशयित आरोपीने त्याचे काही साथीदारासह निफाड गावामध्ये एका वकिलाच्या बंगल्यामध्ये घरफोडी व एक दुचाकी वाहनाची चोरी केल्याची कबुली दिली.
खरेदीचा बनाव
करत कार पळविली
नाशिकरोड : खरेदीचा व्यवहार पूर्ण न करताच बनावट किल्लीचा वापर करून दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टागोरनगर साईकुटी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिरीन रहीम पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर (एमएच १२ जीके ४७२७) होती. त्या गाडीवर फायनान्सचे कर्ज होते. पठाण यांनी त्यांचे नातेवाईक संशयित समीर जलील शेख (रा. रेणुकानगर, द्वारका) यांना गाडी विकली. मात्र समीर याने कर्जाची हप्ते न फेडल्याने पठाण यांनी शेख यांच्याकडून घेतलेले पंचवीस हजार रु पये त्याला देऊन गाडी परत नेली. दि. १९ मे रोजी टागोरनगर येथे घरासमोर लावलेली गाडी शेख याने बनावट चावीने गाडी चोरून नेली. उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत २२ हजारांचा ऐवज लंपास
नाशिकरोड : जगताप मळा येथील पूजादीप हाऊस या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने २२ हजारांचा ऐवज चोरून गेला.
जगताप मळ्यातील प्रदीप वासुदेव गोसावी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ जुलै रोजी बंगला बंद करून ते पत्नीसोबत मुंबईला गेले होते. दि. २५ आॅगस्ट रोजी ते घरी आले असता त्यांना खिडकीचा दरवाजा उघडा व गज कापलेले दिसले. चोरट्याने बंगल्यात घुसून सात साड्या, तीन शालू, स्पीकर असा २२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.