नाशिकरोड येथील तीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:15 AM2019-09-21T01:15:20+5:302019-09-21T01:16:42+5:30

बँक आॅफ इंडियाच्या आवारात दुचाकी उभी करून बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

Three lakh jewelry looted at Nashik Road | नाशिकरोड येथील तीन लाखांचे दागिने लंपास

नाशिकरोड येथील तीन लाखांचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देघटना सीसीटीव्हीत 

नाशिकरोड : बँक आॅफ इंडियाच्या आवारात दुचाकी उभी करून बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेतील संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नाशिकरोड गुरुद्वाराजवळील आॅयकॉन प्लाझा इमारतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत आलेल्या महिलेच्या स्कुटीतील डिक्कीतून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविले. अंबड लिंकरोड भागातील म्हाडा वसाहतीत राहणाºया मुमताज सलमान पठाण या मुलगा शाहरुख व मुलगी हिना यांच्यासोबत एमएच १५ डीव्ही १३१४ क्रमांकाच्या स्कुटीवरून शुक्रवारी दुपारी बॅँकेत आल्या असता त्यांनी बँकेच्या आवारातील जागेत स्कुटी उभी केली. त्या बँकेत गेल्यानंतर चोरट्याने स्कुटीच्या डिक्कीतून दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या आदी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. पठाण सुमारे एक तासानंतर बँकेतील काम आटोपून स्कुटीजवळ आल्या असता त्यांना डिक्कीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त आर. आर. पाटील, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करतानाच बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी स्कुटीची डिक्की लॉक न होता उघडी असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three lakh jewelry looted at Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.