तीन लाखांच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:29 PM2019-10-03T23:29:32+5:302019-10-03T23:30:12+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरेनगर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरेनगर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.
दुकानदारास पाच हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पिंपळगाव ग्रामपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून प्लॅस्टिकबंदीची जनजागृती करण्यात आली होती.
त्यात नागरिकांचे प्रबोधन-देखील करण्यात आले होते. तरीदेखील प्लॅस्टिकची सर्रास विक्री होत असल्याने ग्रामपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.
यापुढील काळातही प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व विक्री करणाºया दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.