शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:52 PM2019-02-18T17:52:42+5:302019-02-18T17:53:01+5:30

विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला.

Three lakhs of rupees were stolen in the city | शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला

शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला

Next
ठळक मुद्देदोन ठिकाणची घरे फोडून ५५हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला

नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ चोरट्यांनी घरफोडी करून घरातून ५४ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडी, दुचाकीचोरीपासून खूनापर्यंतच्या घटना इंदिरानगर परिसरात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पोलीसांनी इंदिरानगरमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गार्डन कॉलनीजवळ असलेल्या विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर घरातून ३ ग्रॅम ६४० मिलिग्रॅमचे दहा हजाराचे मंगळसुत्र, १ग्रॅम ५८०मिलिग्रॅम वजनाचे साडेचार हजार रु पयांचे कानातील टॉप, ३ ग्रॅम ७५० मिलिग्रॅमचे साडेनऊ हजार रु पयांचे कानातील टॉप, १ग्रॅम ९५०मिलिग्रॅमची सहा हजार रु पयांची सोन्याची पोत या दागिण्यांसह २४ हजारांची रोकड असा एकूण ५४ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दांडगे पुढील तपास करीत आहेत.
पंचवटीतील रासबिहारी शाळेमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन ठिकाणची घरे फोडून ५५ हजार रु पयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील साईकुंज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता सुहास दरगुडे यांचे व त्यांचे शेजारी रवींद्र त्र्यंबक नांद्रे यांच्या घराचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी हात साफ केला. घरातील दागिणे घेऊन पोबारा केला. या दोन्ही सदनिका बंद होत्या त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. दरगुडे, नांद्रे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना आपल्या घरात घरफोडी करून दागिण्यांची चोरी केली.दरगुडे यांच्या घरातून ४० हजार रु पयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याने दागिने व नांद्रे यांच्या घरातून १५हजारांची रोकड असा ५५हजार रु पयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी अज्ञात घरफोड्यांविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरिक्षक गिरमे करीत आहेत.

Web Title: Three lakhs of rupees were stolen in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.