संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद

By admin | Published: May 26, 2017 12:43 AM2017-05-26T00:43:12+5:302017-05-26T00:43:28+5:30

नाशिक : येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजारांची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते

Three marshals in the Sangamner Dock | संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद

संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंधरवड्यापूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजारांची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते. या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तीन इसम उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने सापळा रचला. दरम्यान, तीन संशयित इसम या भागात फिरताना आढळून आले. ते एका पल्सर दुचाकीवरून या भागात येऊन पिस्तूल खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते. याचवेळी पथकाला खात्री पटल्यानंतर तिघांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीन व गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी या तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी महेश चिंधू ऊर्फ चिंतामण आंधळे (२३, रा. चेहेडी), महेश पांडुरंग लांडगे (२२, रा. वडगाव पिंगळा), सुमित अविनाश निरभवणे (२२, नाशिकरोड) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या तिघांपैकी दोन संशयित हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Three marshals in the Sangamner Dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.