चोरट्याकडून तीन दुचाकींसह १६ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:35 AM2019-11-20T01:35:36+5:302019-11-20T01:36:30+5:30

शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे.

Three mobile phones with 3 bicycles seized from thieves | चोरट्याकडून तीन दुचाकींसह १६ मोबाइल जप्त

चोरट्याकडून तीन दुचाकींसह १६ मोबाइल जप्त

Next
ठळक मुद्देमुद्देमाल ताब्यात : गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक : शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व गुन्हे शाखांसह पोलीस ठाण्यांना गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेने दुचाकीचोरीचा तपास करताना संशयित सराईत गुन्हेगार विजय तुकाराम वाघमारे उर्फ जळक्या (४०,रा. मूळ वेनी, जि. बुलढाणा, सध्या अंबड) याने दुचाकीचोरी केल्याची गुप्त माहिती सहायक निरीक्षक सचिन सावंत, मिलिंद बागुल, अनिल शिंदे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाणे हद्दीत त्याचा शोध घेत सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातील एक मोबाइल, दुचाकी (एम.एच.१५ डीडी ८९९५) जप्ते केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक होंडा डिलक्स दुचाकी (एम.एच.१५ बीवाय ८७१३), होंडा शाइन (एम.एच.०४ इएन ३५१५) पोलिसांनी हस्तगत केली. तसेच शहर व परिसरातील विविध ठिकाणांहून चोरी केलेले सुमारे १६ अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनदेखील जप्त के ले आहे.

Web Title: Three mobile phones with 3 bicycles seized from thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.