धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:14 PM2018-10-26T23:14:11+5:302018-10-27T00:19:00+5:30
उसनवार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी मॉली ऊर्फ निवेदिता पीटर जॉन ऊर्फ निवेदिता संजय मिरपगार (रा़ उपनगर) या महिलेस आर्थिक दंड तसेच तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली़
नाशिक : उसनवार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी मॉली ऊर्फ निवेदिता पीटर जॉन ऊर्फ निवेदिता संजय मिरपगार (रा़ उपनगर) या महिलेस आर्थिक दंड तसेच तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली़ अधिक माहिती अशी की, उमेश नाईक यांच्याकडून आरोपीने २०१४ मध्ये २ लाख ६० हजार रुपये उसने घेतले होते़ तसेच या रकमेच्या परतफेडीसाठी बँकेचा धनादेश दिला होता़ सदर धनादेश न वटता परत आला़ याप्रकारणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ न्यायालयाने आरोपीस दोषी धरून तीन महिने साधी कैद व ३ लाख ७ हजार रुपये नुकसानभरपाईचे आदेश दिले़ फिर्यादी नाईक यांच्यामार्फत अॅड़ आऱ डी़ मोरे यांनी काम पाहिले़