तीन महिन्यांनंतर बांगलादेशची सीमा कांद्यासाठी खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 01:53 AM2022-06-30T01:53:04+5:302022-06-30T01:53:33+5:30

कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसला होता. मात्र, आता बांगलादेश सरकारने कांदा आयात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला असल्याने तीन महिन्यांनंतर बांगलादेशची सीमा कांदा विक्रीसाठी खुली होणार आहे. परिणामी, कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Three months later, the Bangladesh border opened for onions | तीन महिन्यांनंतर बांगलादेशची सीमा कांद्यासाठी खुली

तीन महिन्यांनंतर बांगलादेशची सीमा कांद्यासाठी खुली

Next
ठळक मुद्देआयातबंदी उठविली : देशातील कांद्याला मिळणार चांगला भाव

लासलगाव : कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसला होता. मात्र, आता बांगलादेश सरकारने कांदा आयात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला असल्याने तीन महिन्यांनंतर बांगलादेशची सीमा कांदा विक्रीसाठी खुली होणार आहे. परिणामी, कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

बांगलादेशमधील श्यामबाजार ढाका, पभना, फरदापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याने ४० ते ४५ रुपये किलोची सरासरी ओलांडल्याने किरकोळ बाजारात कांदा भडकला आहे, तसेच बकरी ईद सणामुळे कांदा मागणी वाढेल, याचा अंदाज आल्याने बांगलादेशमधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक एएचएम सफिकझमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे. बांगलादेशने कांद्याची आयात सुरू होण्यासंदर्भात नोटिफिकेशन काढल्याने भारतातील कांदा दरात काहीशी वाढ होण्याची अपेक्षा नाशिक येथील कांदा निर्यातदार व्यापारी विकास सिंग यांनी व्यक्त केली आहे.

इन्फो

लासलगावी ऐतिहासिक उलाढाल

लासलगाव येथील बाजार समितीत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८५ लाख ३४ हजार २६१ क्विंटल कांदा आवक होऊन १३०५ कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली आहे. लासलगाव बाजार समितीचे आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या वाढत्या आवकीचा विचार करत विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करून स्पर्धा निर्माण केल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला कांदा लिलाव बंद ठेवण्याची परंपरा बंद करण्यात आली, तसेच सुट्या आणि शनिवारीदेखील कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव बाजार समितीत ऐतिहासिक अशी कांदा उलाढाल झाली आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशांत निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतूनदेखील मोठे परकीय चलन मिळत आहे.

इन्फो

मागील ५ वर्षांतील उलाढाल

२०१६-१७ - २३६ कोटी

२०१७-१८ - ८३१ कोटी

२०१८-१९ - ४१६ कोटी

२०२०-२१ - ९३९ कोटी

२०२१-२२ - १३०५ कोटी

Web Title: Three months later, the Bangladesh border opened for onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.