नाशिकमध्ये आणखी तीन कोरोना पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:28 PM2020-04-10T20:28:30+5:302020-04-10T20:30:28+5:30
नाशिक- प्रचंड दक्षता घेऊन देखील जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव मधील एक आणि नाशिक शहरातील दोन असे तीन जणांचे पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक- प्रचंड दक्षता घेऊन देखील जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव मधील एक आणि नाशिक शहरातील दोन असे तीन जणांचे पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात अनेक दिवस कोरोनाचा शिरकाव नव्हता. तथापि, आठ दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील एका रूग्णाचा कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आला. त्यानंतर नाशिक शहरातील गोविंद नगर भागात देखील एक रूग्ण आढळल्याने यंत्रणा हालली. महापालिका आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाल्या लागल्या असतानाच दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील पाच जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही मालेगाव येथील पाच जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. यात एक जण चांदवड येथील असल्याचे स्पष्ट झाले होते.
गुरूवारी पाठविण्यात आलेल्या ३१ नमुन्यांचा अहवाल सकाळी प्राप्त झाला आणि त्यात सर्वच निगेटीव्ह असल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता सायंकाळी प्राप्त झालेल्या उर्वरीत ३१ अहवालांपैकी तीन जण पॉझीटीव्ह अहोत. तर निगेटीव्ह २८ जणांचे अहवाल आहेत.मात्र, गेल्या महिन्यांपर्यंत एकही पॉझीटीव्ह रूग्ण नसलेल्या नाशिक जिल्हयात आता एकुण १४ पॉझीटीव्ह रूग्ण असून एकाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.