युक्रेनमध्ये अडकलेले नाशिकचे तीन विद्यार्थी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 01:46 AM2022-03-02T01:46:34+5:302022-03-02T01:46:57+5:30
युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिकमधील २० विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी परतले असून अजूनही १७ विद्यार्थ्यांच्या परतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांच्या संपर्कात अडचणी निर्माण होत असल्याने दिवसभर त्यांचा पालकांशी संपर्क होत नव्हता. मात्र सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
नाशिक : युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिकमधील २० विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी परतले असून अजूनही १७ विद्यार्थ्यांच्या परतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांच्या संपर्कात अडचणी निर्माण होत असल्याने दिवसभर त्यांचा पालकांशी संपर्क होत नव्हता. मात्र सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या नाशिकमधील विद्यार्थ्यांची संख्या २० इतकी आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. गेल्या २४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने नाशिकमधील हे विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य आणि केंद्र शासनाकडून माहिती जाणून घेतली जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांची नावे विमानप्रवासासाठी निश्चित झाली असल्याने विमाने उपलब्ध होतील तसे ते मायदेशी परतणार आहेत.
गेल्या सोमवारी रिद्धी शर्मा ही विद्यार्थिनी नाशिकला परतली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी तेजस्विनी गोरकला ही आणखी एक विद्यार्थिनी नाशिकरोड येथील आपल्या घरी परतली आहे. रोशन गुंजाळ हा विद्यार्थीदेखील भारतात पोहचला असून सध्या तो पुणे येथे आपल्या बहिणीकडे थांबला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो नाशिकला परतणार आहे.
--इन्फो--
एक कुत्राही युक्रेनमध्ये अडकला
युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिकमधील रोहन अंबुरे या विद्यार्थ्याबरोबरच त्याचा कुत्रादेखील युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये जाताना रोहन हा आपल्या लाडक्या श्वानासोबत तेथे आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
--इन्फो--
परतलेल्या विद्यार्थ्यांची नावे
१) रिद्धी सचिन शर्मा
२) तेजस्विनी गोरकला
३) रोहन गुंजाळ
--इन्फो--
अडकलेले विद्यार्थी
१) आदिती विवेक देशमुख
२) प्रतीक प्रमोद जोंधळे
३) गौरी भरत थोरात
४) सिद्धेश रमेश बच्छाव
५) दिशा दीपक देवरे
६) ऋषभ अशोक देवरे
७) सतीश रमेश अठल्ये
८) रोहन कुसुमचंद्र अंबुरे
९) सिद्ध आनंद गायकवाड
१०) निशिता नरसिंग यादव
११) अनिकेत बस्ते
१२) विश्वकर्मा सुरेंद्र
१३) निलंजना लालचंद यादव
१४) सार्थक राजेंद्र पाटील
१५) भूषण रावळ
१६) प्रतिभा सुरेश यादव
१७) श्रद्धा आनंद धोनी