एकाच आठवड्यात तीन वासरेठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:18 AM2018-07-02T01:18:24+5:302018-07-02T01:20:16+5:30
निफाड : शनिवारी (दि. ३०) तालुक्यातील खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. खानगाव थडी येथे गेल्या सहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली हे दुसरे वासरू आहे. एकाच आठवड्यात भुसे व खानगाव थडी परिसरात बिबट्याने ३ वासरू ठार केल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

खानगाव थडी येथे छबू लक्ष्मण जगताप हे शेतात वस्ती करून राहतात. जगताप यांच्या परिचित याच गावचे शेतकरी आप्पा गणपत दौंड यांनी आपला वासरू जगताप यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिले होते. जगताप यांच्या शेतातील घराबाहेर जनावरे बांधलेली होती. यात दौंड यांनी सांभाळण्यासाठी दिलेल्या जर्सी वासराचा समावेश होता.
शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या जनावरांशेजारी बांधलेल्या सदर जर्सी वासरावर हल्ला करून त्याला ठार केले व तीनशे मीटर अंतरावरील उसाच्या शेतात ओढून नेले. ही घटना सकाळी उठल्यावर जगताप यांच्या लक्षात आली, त्यानंतर ही घटना त्यांनी वनविभागाला कळविल्यानंतर येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भय्या शेख व वनमजूर यांचे पथक खानगाव थडी येथे गेले व त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.वस्तीत राहणाऱ्या शेतकºयांमध्ये भीती दि.२४ जून रोजी भुसे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले होते त्यानंतर दुसºयाच दिवशी सोमवारी (दि.२५) भुसे येथून जवळच असलेल्या खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले होते. दि.३० जून रोजी पुन्हा बिबट्याने खानगाव थडी येथे वासरू ठार केले अशा प्रकारे एकाच आठवड्यात बिबट्याने भुसे येथे १ आणि खानगाव थडी येथे दोन वासरू बिबट्याने ठार केल्याने या बिबट्याचे वास्तव्य याच परिसरात असल्याची चर्चा असून, बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यामुळे भुसे, खानगाव थडी येथे शेतवस्तीत राहणाºया शेतकºयांत भीतीचे वातावरण पसरले आहे.