Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले
By अझहर शेख | Updated: December 9, 2023 19:00 IST2023-12-09T18:58:37+5:302023-12-09T19:00:51+5:30
एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे.

Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले
नाशिकमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. गंगापूर रोड येथील शांतिनिकेतन चौक भागात ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधील तीन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे वाहनातील अन्य सिलिंडर हवेत उडाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिकमधील गंगापूर भाग हा अतिशय उच्चभ्रू भाग आहे. आजूबाजूच्या इमारती ऋषिराज होरायझन, शैलजा अपार्टमेंट, पंचमी अपार्टमेंट यामधील बालकनी काचा फुटल्या आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की सिलेंडर आणि आयशर टेंपो विखुरला गेला होता. अग्निशमन दल, गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सिलेंडरचा पत्रा उडून रिक्षावर आदळला होता. यातून प्रवासी आणि रिक्षाचालक थोडक्यात बचावले आहेत. दोन कारचे नुकसान झाले आहे. माजी नगरसेवक शरद पोशिरे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमध्ये भर रस्त्यावर तीन ऑक्सिजन सिलिंडर फुटले... #Nashik#NashikCylinderBlastpic.twitter.com/0uAILRGoS9
— Lokmat (@lokmat) December 9, 2023
एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे.