मोकाट श्वानांच्या हल्ल्यांत तीन पाडस गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:56+5:302021-06-09T04:16:56+5:30
दरम्यान, दि. ७ जून रोजी डॉक्टरवाडी शिवारात देवीदास पगार यांच्या शेतात मोकाट श्वानांच्या हल्ल्यात हरणाचे एक दिवसाचे पिल्लू (पाडस) ...
दरम्यान, दि. ७ जून रोजी डॉक्टरवाडी शिवारात देवीदास पगार यांच्या शेतात मोकाट श्वानांच्या हल्ल्यात हरणाचे एक दिवसाचे पिल्लू (पाडस) गंभीर जखमी झाले. योगेश बागुल, मंगेश आहेर, प्रणय आहेर, यांनी हल्ल्यातून पाडसाची सुटका करून प्रथमोपचार केले. त्यानंतर वनविभागाचे गंडे, राठोड, पाटील यांच्या हवाली केले. मांडवड, जळगाव बु. येथेही दोन पाडसांवर श्वानांनी हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. या जखमी पाडसांचे काय झाले व जंगल क्षेत्राला दोन वेळा लागलेल्या आगीचा तपास अद्याप लागलेला नाही. यासंबंधी वनविभागाकडे विचारणा केली असता काहीच माहिती मिळाली नाही, असे पशुप्रेमींकडून सांगण्यात आले. (०८ नांदगाव १)
------------------------------------
नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर वर्दळ वाढली
नांदगाव
: शहराच्या सौंदर्यात भर घालणारा नांदगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले असून, चाळीस किमी लांबीच्या रस्त्याच्या मधोमध दुभाजकात पथदिव्यांचे खांब उभे आहेत. त्यात रंगीत फुलझाडे लावली आहेत.
दररोज सकाळी व सायंकाळी नागरिक पादचारी मार्गावरून फिरायला जाण्याचा आनंद घेत आहेत.
रस्ता चांगला झाला असल्याने वर्दळ वाढली असून, चारचाकी गाड्या वेगाने जाताना दिसतात. भन्नाट वेगाने वेडीवाकडी वळणे घेताना सर्कसमध्ये असल्यासारखे कारनामे बघून दुचाकीचालकांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी चालकांमध्ये थोडी शिस्त यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मागच्या वर्षी लावलेली शोभेची व फुलझाडे जळून गेली होती. यावेळी लावलेल्या झाडांकडे ठेकेदाराने लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे.
===Photopath===
080621\08nsk_4_08062021_13.jpg
===Caption===
०८ नांदगाव १