उच्च दाबाच्या वाहिनीचा झटका लागून तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:53 AM2017-08-29T00:53:09+5:302017-08-29T00:53:15+5:30

घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा शॉक लागून तिघेजण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तनगर भागात घडली. या घटनेतील जखमीपैकी एकाची प्रकृती भंगीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी त्वरित विद्युत पुरवठा बंद करून जखमींन रुग्णालयात दाखल केले.

Three people were injured in a high-pressure channel | उच्च दाबाच्या वाहिनीचा झटका लागून तिघे जखमी

उच्च दाबाच्या वाहिनीचा झटका लागून तिघे जखमी

Next

सिडको : घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा शॉक लागून तिघेजण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तनगर भागात घडली. या घटनेतील जखमीपैकी एकाची प्रकृती भंगीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी त्वरित विद्युत पुरवठा बंद करून जखमींन रुग्णालयात दाखल केले. सिडको परिसरातील दत्त चौक भागात सोमवारी (दि. २८) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कमलेश सोनवणे (३१, रा. मोरवाडी), रवि चव्हाण (१८, रा. मोरवाडी) व अन्य एक जण असे तिघे घराच्या गच्चीवर काम करीत होते. याचदरम्यान कमलेश यांना काम करीत असताना घराजवळील उच्च दाबाच्या केबलचा शॉक लागल्याने ते तारेलाच काही वेळ चिटकले, त्यावेळी विजेच्या तारेवर मोठया ज्वाळा उठल्या. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी लगेचच जवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला मात्र त्यांनी फोन न उचलल्याने नागरिकांनी थेट कार्यालयातच धाव घेत वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. यानंतर परिसरातील विकास कुमावत, दशरथ तोटे, सागर पाटील, संतोष गायकवाड, दादाजी वाघ, प्रवीण महाले यांनी सोनवणे व अन्य दोघांना रुग्णालयात दाखल केले. यातील रवि चव्हाण व कमलेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, कमलेश हे गंभीर जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच परिसरात याआधीदेखील विजेचा शॉक लागून एका महिलेसह तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विजेच्या तारांचा प्रश्न सुटला नाही
सिडको भागात अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरावरून उच्च दाबाच्या वीजतारा लोंबकळत असून, याबाबत महावितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने वारंवार अशा घटना घडत असतात. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसात गच्चीवर पतंग उडवित असतानाही असे अनेक प्रकार घडले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभा तसेच प्रभाग सभेत आवाज उठविला असला तरी अद्यापही विजेच्या तारांचा प्रश्न सुटू शकलेला नाही.

Web Title: Three people were injured in a high-pressure channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.