पिंगळवाडे येथील दुकान फोडणारे तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 04:39 PM2019-01-16T16:39:38+5:302019-01-16T16:39:52+5:30
जायखेडा : वाटमारीचाही छडा लावण्यात यश
सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील दुकानफोडी व मांगीतुंगी रस्त्यावरील वाटमारीचा छडा लावण्यात जायखेडा पोलीस ठाण्याला यश आले असून तिघांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी वाटमारी करणाऱ्या चोरट्यांच्या घरावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत सहा जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाटमारीतील तिघे मात्र फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तालुक्यातील पिंगळवाडे येथील संजय महादू देवरे यांच्या कापड दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी विविध कंपन्याचे अंडरवेअर तसेच दहा हजार रु पयांची रोकड लुटून पोबारा केला होता.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तपासाची चक्र शीघ्र गतीने फिरवली .पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर करंजाड येथे विहिरीवर काम करणारे मजूर असल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी विहिरीजवळ छापा टाकून राजेंद्र मामू कंजर ,पप्पू गुलाब कंजर ,महेंद्र मुकेश कंजर (तिघेही राहणार मोहपुरा, ता.बनेडा जि.भिलवाडा,राजस्थान ) यांना अटक करून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी तिघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
इन्फो
मांडूळचे आमिष दाखवून लूट
वरळी ,मुंबई येथील पत्रकार सुरेश मदनलाल शर्मा (३८ )मोहिनीश मोहन मयेकर ,दीपक सीना शेट्टी ,अजय भोजने यांचेशी तिघांनी तीन किलो वजनाचे मांडूळ विक्र ी करण्याबाबत मोबाईलवर चर्चा केली. त्यानंतर काही किंमतीत सौदा पक्का करण्यात येऊन मांगीतुंगी परिसरातील डोंगराजवळ मांडूळची डील करण्याचे ठरले.त्यानुसार गेल्या १६ डिसेंबरला रात्री दीड वाजेच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी मांडूळ देण्याच्या नावाखाली चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चार महागड्या कंपनीचे मोबाइल ,एक तोळा सोन्याची चेन असा एकूण ८३ हजार रु पयांचा ऐवज लुटून नेला.याबाबत जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मोबाइलवर आलेल्या कॉल्सची माहिती घेऊन चोरीचा छडा लावला. वाटमारीतील चोरटे धुळे जिल्ह्यातील जामदे येथील असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर जायखेडा पोलिसांनी फरार इकबाल जाकीर चव्हाण, सिर्वस अशोक पवार ,नितेश जहांगीर चव्हाण यांच्या जामदे येथील घरांवर छापा टाकण्यात आला.या छाप्यात लुटमारीतील दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले.यातील नितेश चव्हाण हा २०१२ मध्ये माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या निवासस्थानी टाकलेल्या दरोड्यातील मुख्य सूत्रधार आहे.याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी तिघांविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.