मालेगावी टोळक्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर, एकावर गोळी झाडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 09:42 AM2019-02-02T09:42:32+5:302019-02-02T09:43:42+5:30

शुक्रवार रात्री उशिरा 10 ते 15 गुंडांच्या टोळक्याने आयेशा नगर व पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात तलवारी, कोयते दुचाकीवरून फिरून परिसरात चार ठिकाणी हल्ले करीत दहशत निर्माण केली.

Three persons serious attacks in Malegaon | मालेगावी टोळक्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर, एकावर गोळी झाडण्याचा प्रयत्न

मालेगावी टोळक्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर, एकावर गोळी झाडण्याचा प्रयत्न

Next

मालेगाव मध्य (नाशिक) : शुक्रवार रात्री उशिरा 10 ते 15 गुंडांच्या टोळक्याने आयेशा नगर व पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात तलवारी, कोयते दुचाकीवरून फिरून परिसरात चार ठिकाणी हल्ले करीत दहशत निर्माण केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी रात्री साडेदहा ते पाऊणे अकरा वाजेच्या सुमारास 10 ते पंधरा गुंडांनी आयेशा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 71, नॅशनल सायझिंग समोरील मनपा प्राथमिक शाळेच्या आवारात हारुण खान अय्युब खान (32, रा. सोनिया कॉलनी) याच्यावर कट्ट्याने गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हारुण जीव वाचवत पळून गेला. मात्र त्याचा साथीदार गुंडांच्या तावडीत सापडला. त्याच्यावर तलवार व कोयत्याने हल्ला केल्याने त्याच्या डोक्यात गंभीर मार लागला. त्यानंतर हारुणचा पाठलाग करत घरात लपला असल्याच्या संशयावरून त्या घराच्या दारावर हत्याराने वार केले. त्यानंतर गुंडांच्या टोळक्याने आपला मोर्चा जाफर नगरकडे वळविला. येथील बिस्मिल्ला हॉटेल येथे एका रिक्षाची व टाटा इंडिगो कार (एमएच-04-डीजे-3088)च्या समोरील व दरवाजाच्या काचा फोडल्या. हॉटेलच्या सामानाची नासधूस करीत अतीक खान अलियार खान (40, रा.महेवी नगर) यास जखमी केली. जवळच असलेली माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची समाज प्रबोधन सभा नुकतीच संपल्याने चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. काही कळण्याच्या आतच गुंडांकडून वाहनांची व हॉटेलच्या सामानची तोडफोडच्या आवाजाने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. येथून पुढे जात बारदान नगर, नवी वस्ती येथे सुलभ शौचालयाच्या दरवाजाची तोडत व्यवस्थापक पवन संतोष पवार (22,रा. हरिओम नगर, कलेक्टरपट्टा) व सोहेल अंजुम मोहंमद यासीन (19, रा.फार्मसी नगर) तरुणास मारहाण करून पळ काढला. पुढे मिल्लत नगर येथील यंत्रमाग कारखान्यात घुसुन मोहंमद आबिद मोहंमद जाबीर (30, रा.बाग ए कासिम) याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आबिदच्या हाताची दोन बोटे व डोक्यास गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात फय्याज अहमद नियाज अहमद रा. गोल्डन नगर हाही गंभीर जखमी झाला आहे. परंतु त्याच्यावर नक्की हल्ला कोणत्या ठिकाणी झाला हे मात्र समजू शकले नाही. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आयेशा नगर व पवारवाडी पोलीस ठाण्यापासुन अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर दुचाकीवरून फिरुन सुमारे अर्धा तास गुंडांनी अक्षरशः हैदोस घातला होता. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती परिसरात पसरताच सर्वच ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने काही काळ तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, आयेशा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसुद खान, पवारवाडीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गिरी, शेख यांनी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागे झाली. निलोत्पल यांनी तपासाबाबत मार्गदर्शनपर सूचना देत आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Three persons serious attacks in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.