राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी नाशिकचे तीन खेळाडू पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:39 PM2018-11-24T15:39:53+5:302018-11-24T15:40:14+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शालेय मुला-मुलींच्या राज्य ज्युदो स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून झारखंड व गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

Three players from Nashik are eligible for National Judo Tournament | राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी नाशिकचे तीन खेळाडू पात्र

राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी नाशिकचे तीन खेळाडू पात्र

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शालेय ज्युदो स्पर्धेत नाशिकच्या खेळाडुचे यशझारखंड, गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीन खेळाडू पात्र

नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शालेय मुला-मुलींच्या राज्य ज्युदो स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून झारखंड व गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत सुमारे चारशे ज्युदो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नाशिकचे खेळाडूंनी यात चमक दाखवली. यामध्ये सार्थक कांबळे, जयेश शेटे आणि आकांक्षा शिंदे यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. झारखंड आणि गुजरात येथे होणाऱ्या शालेय ज्युदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाशिकचे हे खेळाडू पात्र ठरले. त्याचप्रमाणे प्रकाश काळे, प्रतीक घुगे, पार्थ दाभाडे, कुणाल गोरे, रु चिका बैरागी, दिव्या कर्डेल यांनी रौप्यपदक तर अखिलेश सानप, ईशिता सोनवणे, करुणा थट्टेकर यांनी कांस्यपदक पटकावले. नाशिकच्या ज्युदो खेळाडूंना योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, पवन कस्तुरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

Web Title: Three players from Nashik are eligible for National Judo Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.