फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:50 AM2019-08-31T00:50:35+5:302019-08-31T00:51:06+5:30

वेगवेगळ्या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाºया तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे.

 Three robbers arrested by phone call | फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना अटक

फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना अटक

Next

नाशिक : वेगवेगळ्या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाºया तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे.
निशांतकुमार ओमप्रकाश सिंग (२३, रा. उत्तर प्रदेश), मोहम्मद रयाझउद्दीन फेजल (२२, रा.पटना, बिहार), तरुणकुमार सिंग (२४, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, यांच्याकडून ८१ सीम कार्ड, दहा मोबाइल, फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड, असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली आहे.
फोनकॉलद्वारे आपल्या खात्याची माहिती जाणून घेत फसवणूक झाल्या प्रकरणी १२ ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फसवणूक झाल्याची फिर्याद नंदी दत्तू भिसे (३०) यांनी दिली होती. या प्रकरणाचा सायबर पोलीस शाखेने सखोल तपास केलानंतर तीन जण संगनमताने दिल्लीतून बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बँक स्टेटमेंट व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून नवी दिल्लीतील कॉल सेंटरचा पत्ता शोधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.
या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दहा मोबाइल फोन, फिंगर प्रिंट स्कॅनर, ३४ सिमकार्ड, दहा हजार रुपये जप्त केले. तिघांनाही न्यायायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तिघांनी १५ लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले

Web Title:  Three robbers arrested by phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.