सटाण्यात तीन दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:52 AM2018-06-16T00:52:33+5:302018-06-16T00:52:33+5:30
वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील कºहे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला.
सटाणा : वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील क-हे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला. हे पाचही दरोडेखोर कºहे येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरु वारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नामपूर-सटाणा रस्त्यावरील कºहे गावानजीकच्या गणपती नाल्यावर दगडगोटे आणि झाडांच्या फांद्या रस्त्यावर टाकून पाच बुरखाधारी दरोडेखोरांनी येणाºया जाणाºया वाहनांवर तुफान दगडफेक करून तोडफोड करून धुडगूस घातला होता. यापूर्वी कुपखेडा गावाचे पोलीसपाटील बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला चढविला मात्र ठाकरे यांनी प्रतिकार करून हल्ला परतवून लावला, तर डॉ.अमोल पवार यांचे आईवडील नामपूरकडे जात असताना त्यांच्या कारवरही हल्ला करून दांपत्याला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. बारा ते तेरा वाहने फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी पाच जणांविरु द्ध दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून तलवार, गज, मिरचीची पूड जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील करीत आहेत.
महिलांसह पाच जणांना बेदम मारहाण
संशयितांनी तलवार आणि गजांचा धाक दाखवून जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विश्वास भामरे यांची स्विफ्ट डिझायर कार अडविली. यावेळी कारमधील दोन महिलांसह पाच जणांना बेदम मारहाण करून अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असताना गस्तीवर असलेल्या सटाणा पोलिसांनी त्यांची दरोडेखोरांपासून सुटका केली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच पैकी तीन जणांना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. दोघे दरोडेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.