सटाण्यातील तीन दरोडेखोरांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:51 AM2018-06-17T00:51:18+5:302018-06-17T00:51:18+5:30
नामपूर रस्त्यावरील कºहे गावानजीक वाहने अडवून लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना शनिवारी (दि.१६) सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सटाणा : नामपूर रस्त्यावरील कºहे गावानजीक वाहने अडवून लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना शनिवारी (दि.१६) सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या गुरुवारी रात्री कºहे येथील किरण संजय जगताप (२३), बबन भावराव अहिरे (२२), पंकज विठ्ठल म्हसदे (२२), गणेश निंबा सोनवणे व बबलू जयसिंग सोळंखे यांनी सटाणा-नामपूर रस्ता अडवून वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर दहा ते बारा महिला व पुरु षांना बेदम मारहाण करून वाटमारी करण्याचा प्रयत्नांत असताना गस्ती पथकाने त्यांना अटक केली. मात्र यात गणेश सोनवणे व बबलू सोळंखे पोलिसांना चकवा देऊन फरार झाले. तिघा दरोडेखोरांकडून पोलिसांनी एक अपेरिक्षासह तलवार, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, मिरची पूड असे साहित्य जप्त केले आहे. सटाणा पोलिसांनी या संशयितांविरु द्ध गुन्हा दाखल केला करून शनिवारी सटाणा न्यायालयात उभे केले असता न्यायमूर्ती पी.जे. तापडिया यांनी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फरार अन्य दोघांच्या शोधार्थ एक विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.