वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:55 PM2019-04-07T23:55:07+5:302019-04-07T23:58:53+5:30
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे मुंबईहून नाशिककडे जात असताना या मोटारसायकलस्वाराने (क्र. एम १५ एके ७२०) नाशिककडे जात असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जनक सुकदेव फोडसे (२३ रा. काळुस्ते, इगतपुरी), अप्पू भावोजी भगत (२५, रा. तळोघ, इगतपुरी), गोटीराम दादू आगिवले (३०, रा. भावली, इगतपुरी) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे शनिवारी (दि.६) रात्री साडेसात वाजता झालेल्या अपघातात नाशिकहून मुंबईकडे जात असताना या मोटारसायकलस्वाराचे (क्र . एम १५ बीबी ५५३६) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.
या झालेल्या अपघातात नाशिक येथील मोरवाडीत राहणारे प्रकाश हसाराम सोनवणे (४०), सविता प्रकाश सोनवणे (३०) हे दांपत्य व जोसेफ प्रकाश सोनवणे (९), सामवेल प्रकाश सोनवणे (१) त्यांची ही दोन मुले (रा. सर्व मोरवाडी, नाशिक) किरकोळ जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.