दोन अपघातात तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:25 PM2020-12-25T17:25:26+5:302020-12-25T17:25:46+5:30

गोंदे दुमाला ते व्हीटीसी फाटा : अपघातांची मालिका सुरूच

Three seriously injured in two accidents | दोन अपघातात तीन गंभीर जखमी

दोन अपघातात तीन गंभीर जखमी

Next
ठळक मुद्दे अपघातातील अज्ञात वाहन पसार

नांदूरवैद्य : नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळी ते मुंढेगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरुच असून गोंदे दुमाला परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व्हिटीसी फाट्याजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या आयशरने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात एका अज्ञात वाहनाने गोंदे दुमाला येथील दोन तरुणांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२४) रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील व्हिटीसी फाटा येथे भरधाव वेगाने जात असतांना आयशर (क्रमांक एम.एच.१५, ए.जी.६८०९) या वाहनाने समोरून चाललेल्या मोटरसायकल (क्रमांक एम.एच.१५, ए.जे. १२०२) या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रोहन रतन मोकळ (वय ४८ रा.विखरने ता. येवला) ही व्यक्ती गंभीर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या व्यक्तीस नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर गोंदे दुमाला परिसरात असलेल्या नाशिक -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने गोंदे दुमाला येथील मोटरसायकल (क्रमांक एम.एच. १५,जी.सी. ६७२०) या मोटरसायकला जोरदार कट मारून मोटरसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्यामुळे झालेल्या अपघातात गोंदे दुमाला येथील मोहन विठोबा नाठे (वय ३३, गोंदे दुमाला), मोहन भिकाजी नाठे (वय ६०, गोंदे दुमाला) हे दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील अज्ञात वाहन पसार झाले असून वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कर्मचारी करीत आहेत.
 

Web Title: Three seriously injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.