एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:48 AM2018-04-28T00:48:45+5:302018-04-28T00:48:45+5:30

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी दिले.

 Three sets of single-generation power generation will continue | एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार

googlenewsNext

एकलहरे : एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी दिले. एकलहरे येथील तिसरा संच बंद केल्याबाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर यांनी मुंबई येथे महानिर्मितीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन एकलहरे येथील तिसरा संच बंद करून तो कोळसा खासगी कंपनीकडे वळविल्याबद्दल निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यावेळी ठेकेदार संघटनेचे निवृत्ती चाफळकर यांनी नाशिकला कोळशासाठी वॅगनला डॅमरेज व आॅइल कन्झमशन शून्य आहे. तीन-चार वर्षानंतर मेन्टेनन्स केला जात असल्याने ३.२७ रुपये खर्च येतो. मात्र दरवर्षी मेन्टेनन्स केल्यास तो खर्च २.६०पर्यंत येऊ शकतो असे स्पष्ट केले. गोडसे व घोलप यांनी राज्यात सातपैकी सहा ठिकाणी नवीन वीज प्रकल्प झालेत, मात्र नाशिकला झाला नाही. कोळसा वाहतूक, पाणी, जागा, इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ आदी सर्व बाबी नाशिकला अनुकूल आहेत. येथील संच चार असूनही वर्षभर अविरत चालू आहे. नवीन ६६०चा प्रकल्पासाठी सर्व बाबी अनुकूल असून, जोपर्यंत नवीन संच सुरू होत नाही तोपर्यंत जुने संच बंद करू नये, अशी मागणी केली. यावेळी शिष्टमंडळामध्ये दिलीप चव्हाण, संतोष जायगुडे, सदाशिव अत्तरदे, शांताराम राजोळे, शरद घुगे, सागर जाधव, योगेश म्हस्के आदी उपस्थित होते.
तीनही संच सुरू राहतील
महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी फक्त आठ महिन्यांकरिता खासगी कंपनीशी करार झाला आहे. एकलहरे येथील संचांची दुरूस्ती व मेंटेनन्स करून आहे त्या परिस्थितीत तीनही संचांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जोपर्यंत एकलहरे वीजनिर्मितीला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील, असे श्रीमाळी यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Three sets of single-generation power generation will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज