तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:57 AM2018-11-18T00:57:50+5:302018-11-18T00:58:06+5:30

आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़

Three suicides in three cases | तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

Next

नाशिक : आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ अमर ऊर्फ अमित बळीराम लोमटे ( रा. रो-हाऊस नंबर ४३, लोकधारा सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. खासगी ठेकेदारीचे काम करणाऱ्या अमर लोमटे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दुसरी घटना सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़ धम्म चौकातील रहिवासी भीमराव शंकर उबाळे (३७, रा. वरीलप्रमाणे) यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, सापतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़
तिसरी घटना पंचवटीतील फुलेनगरमध्ये घडली़ युवराज विजय बोराडे (२८, रा. फुलेनगर) या युवकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच त्याचे वडील विजय बोराडे यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
रेल्वेतून पडून कर्मचाºयाचा मृत्यू
नाशिकरोड : सिमला येथे रेल्वेने जाणाºया साने गुरुजी शिक्षण संस्थेतील कर्मचारी केशव संगमनेरे (५३) यांचे रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जयभवानीरोड लवटे मळा येथील संगमनेरे हे आपल्या मित्रांसोबत सिमला येथील कुलू मनाली येथे फिरण्यासाठी रेल्वेने जात होते. गुरूवार (दि. १५) रात्री संगमनेरे हे रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे.
शहरातून दोन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटर व कॉलेजरोड परिसरातून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर व पिंपळगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्णा सोसायटीतील रहिवासी अजय राजभर यांची दुचाकी (एचआर ०१, पी ८०५९) संशयित प्रवीण ऊर्फ चाफा निंबाजी काळे याने सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पाटीलनगरमधील रहिवासी सतीश कांबळे यांची दुचाकी (एमएच २०, सीएल १७४१ ) चोरट्यांनी कॉलेज रोडवरीलशोरूमच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Three suicides in three cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.