युवकाच्या खूनप्रकरणी तिघा संशयिताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:07 AM2017-08-26T01:07:07+5:302017-08-26T01:07:14+5:30
वणी - दिंडोरी रस्त्यावरील परमोरी शिवारातील लखमापूर फाटा परिसरात युवकाच्या खूनप्रकरणी तीन संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वणी : वणी - दिंडोरी रस्त्यावरील परमोरी शिवारातील लखमापूर फाटा परिसरात युवकाच्या खूनप्रकरणी तीन संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परमोरी शिवारातील एका कंपनीलगत खोलीत श्याम श्रीराम चकोर (२५) या युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूस दोन ठिकाणी हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली. युवकाच्या खुनाच्या कारणाचा तपास करता फुलन रामभवन रॉय, राधिका फुलन रॉय, रामविलास शिवपुंजन रॉय (सर्व रा. दिवालकपूर, ता.नरैना सकलडिया, जि. चांदौली, उत्तर प्रदेश, हल्ली राहा. लखमापूर फाटा) यांनी संशयावरून कुरापत काढून चकोर याचा खून केल्याची फिर्याद लीलाबाई श्रीराम चकोर यांनी दिली. यानुसार तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून त्याना उशिरा अटक करण्यात आली आहे.