नाशिकला लागून असलेले तीन तालुके ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:59 PM2020-09-18T23:59:47+5:302020-09-19T01:34:00+5:30
नाशिक : नाशिक तालुक्याला लागून असलेल्या निफाड, सिन्नर, दिंडोरी या तीन तालुक्यांचा शहराशी कामधंदे व व्यवसायानिमित्त येणाऱ्या संबंधातून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, या तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागदेखील सुरक्षित राहिलेला नसल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढला आहे.
नाशिक : नाशिक तालुक्याला लागून असलेल्या निफाड, सिन्नर, दिंडोरी या तीन तालुक्यांचा शहराशी कामधंदे व व्यवसायानिमित्त येणाऱ्या संबंधातून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, या तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागदेखील सुरक्षित राहिलेला नसल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढला आहे.
नाशिक जिल्'ात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये निफाड तालुक्यात सापडला होता, त्याची दखल घेत आरोग्य विभागाने कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले, त्याला बºयाच अंशी यश मिळाले. नाशिक शहरापेक्षा ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित वाटू लागला असताना, लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आजमितीला ग्रामीण भागात तीन हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. नागरिकांची वाहतूक, सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार अधिक झाल्याचे दिसत असले तरी, नाशिक तालुक्याला लागून असलेल्या निफाड तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. निफाड तालुक्यात ८९१ रुग्ण असून, एकट्या ओझरला निम्मी संख्या आहे.
कोरोनाचा निफाड, सिन्नर व दिंडोरी तालुक्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासानुसार निफाड तालुक्याची संख्या साडेपाच लाख इतकी आहे. जिल्'ात मालेगाव वगळता सर्वात मोठा तालुका निफाड आहे व त्यातील ओझर, पिंपळगाव, निफाड, लासलगाव, विंचूर, सायखेडा ही महत्त्वाची गावे, बाजारपेठ आहेत. बाजार समितीत दररोज हजारो शेतकरी शेतमाल घेऊन येतात, त्यांचा अनेकांशी संपर्क येतो, शिवाय कोरोना टाळण्यासाठी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. तसेच या तालुक्यातील नागरिकांचा थेट नाशिक, मुंबईशी संबंध येतो. अशीच परिस्थिती सिन्नर तालुक्याची आहे. नाशिकशी असलेले अंतर, उद्योग, व्यवसाय, सामाजिक व राजकीय दृष्टीने सिन्नरचा नाशिकशी अधिक संपर्क आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. या तालुक्यातील शेतकरी आपला माल नाशिक बाजार समितीत आणतात. दिंडोरीच्याबाबत तोच प्रकार आहे. या तिन्ही तालुक्यांतील नागरिकांचा नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेशी संबंध येतो, शिवाय त्यांच्या सीमा लागून असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे
नाशिक शहराशी निफाड, सिन्नर, दिंडोरीच्या नागरिकांचे व्यवसाय, व्यापार, उद्योगानिमित्त निकटचे संबंध आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर वाहतूक सुरू होऊन निर्बंध राहिले नाहीत, परिणामी कोरोनावाढीस पोषक वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी पूर्वीसारखी काळजी घेतल्यास कोरोनाला अटकाव करणे शक्य आहे.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्'ातील कोरोनाची स्थिती-----
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ४३८, चांदवड १९०, सिन्नर ३९९, दिंडोरी १६०, निफाड ८९१, देवळा ९४, नांदगाव ३८४, येवला ११५, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा २२, पेठ १५, कळवण ७५, बागलाण ३०१, इगतपुरी १७६, मालेगाव ग्रामीण ३१२ असे एकूण ३ हजार ६०८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ९७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५५७ तर जिल्'ाबाहेरील ७४ अशा एकूण १० हजार ३३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.