तीन तालुक्यांत पीक कापणी प्रयोग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:24 AM2018-10-12T01:24:06+5:302018-10-12T01:26:52+5:30

संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

In three talukas crop harvesting experiment? | तीन तालुक्यांत पीक कापणी प्रयोग का?

तीन तालुक्यांत पीक कापणी प्रयोग का?

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ यांचा सवालसहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : राज्य सरकारची महसूल यंत्रणा विश्वासार्ह असूनही सरकारकडून महसूल यंत्रणेवर का विश्वास ठेवला जात नाही, त्याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून ऐन पावसाळ्यात २३८ गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांचा चारा आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाई असूनही दुष्काळ जाहीर करण्यासाठी विलंब केला जात आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी, पेरणी (लागवड) क्षेत्र, मृद आर्द्रता व पिकांची स्थिती हे प्रमुख निर्देशांक आहेत. त्यानुसार, ‘केंद्राच्या नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग’ या संस्थेकडून पीक पाण्याच्या स्थितीबाबत राज्य शासनाला अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याने हा प्रकार म्हणजे एकप्रकारे राज्यातील महसूल यंत्रणेवर अविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे एवढा गंभीर दुष्काळ असताना दुसरीकडे अनेक बँका व पतसंस्थांकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. दुष्काळामध्ये बँकेची कर्जवसुलीची नोटीस पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीने आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजेची थकबाकी असलेल्या शेतकºयांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. अघोषित वीज भारनियमनामुळे राज्यातील नागरिक हैराण झालेले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकºयांना कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता असल्याची त्यांनी मागणी केली आहे.
दुष्काळी स्थिती भयावह
चांदवड व येवला तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पीक पाहणी अहवालानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे आणि महसूल यंत्रणेने जिल्हा प्रशासनास तसा अहवालही पाठविलेला आहे. दुष्काळी स्थिती एवढी भयावह असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश दिल्याने त्यावरही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: In three talukas crop harvesting experiment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.