टँकरमधून पेट्रोल-डिझेल काढणारे तिघे रंगेहाथ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:27 PM2019-02-24T17:27:40+5:302019-02-24T17:28:06+5:30

चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात पेट्रोल टँकर मधून अवैधरित्या पेट्रोल-डिझेल काढणाऱ्या तिघाना रंगेहाथ पकडत त्यांच्यावर विविध कलमानवये चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शनिवारी (दि.२३) दुपारी मनमाड-मालेगाव रोडवर हॉटेल गुरु कृपा ढाब्याच्या पाठीमागे हि कारवाई करण्यात आली.

Three tankers carrying petrol and diesel were taken from the tanker | टँकरमधून पेट्रोल-डिझेल काढणारे तिघे रंगेहाथ ताब्यात

चांदवड येथे पेट्रोल चोरणाºया आरोपीसह नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक.

Next
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण विशेष पोलीस पथकाची कारवाई : टँकरसह १५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात पेट्रोल टँकर मधून अवैधरित्या पेट्रोल-डिझेल काढणाऱ्या तिघाना रंगेहाथ पकडत त्यांच्यावर विविध कलमानवये चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शनिवारी (दि.२३) दुपारी मनमाड-मालेगाव रोडवर हॉटेल गुरु कृपा ढाब्याच्या पाठीमागे हि कारवाई करण्यात आली.
मनमाड-मालेगाव रोडवर गुरु कृपा ढाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये पेट्रोल, डिझेल काढणे व त्याची साठवणूक करण्याचे बेकायदेशीर काम सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर नाशिक ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत तिघांना रंगेहात पकडले. यावेळी टँकर (एमएच १९ झेड १९१६) यातून ज्वालाग्रही पदार्थ काढणे व त्याची अवैधरित्या साठवणूक करतांना तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. यात ज्ञानेश्वर हिरामण गिडगे, मोसीन मुन्ना शेख, शहाबाज मुन्ना शेख बोरी या आरोपीना टँकर व काढलेल्या पेट्रोल डिझेलसह एकुण १५ लाख ५१ हजार ४१६ रु पयांचा मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयितांवर चांदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणाºया पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख, पोलीस हवालदार कुणाल मराठे, किशोर आहेरराव, प्रमोद मंडलिक, संदीप चौरे, विश्वास चौधरी यांचा सहभाग होता.

Web Title: Three tankers carrying petrol and diesel were taken from the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.